अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या ; रोह्यातील खळबळजनक घटना

548

अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी,सारिका पाटील) : रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापनजक घटना काल (26 जुलै) सायंकाळी उशीरा उघडकीस आली आहे. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही सशंयीतांना ताब्यात घेऊन कसुन चौकशी सुरु आहे. रोहा तालुक्यातील तांबडी येथील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळ पासून ही मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. परंतु सायंकाळी ताम्हणशेत जवळील जगंलात एका ओव्हळा जवळ या मुलीचा मृतदेह सापडला. याबाबतची माहिती रोहा पोलिसांना मिळताच त्यांची घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा रोहा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हे रोह्यात दाखल झाले व रात्रीपासुन ठाण माडुंन बसले असुन काही सशंयीतांना ताब्यात घेतले आहे. तर आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेचा अधिक तपास रोह्याचे डिवायएसपी किरण सूर्यवंशी हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेबाबत रोह्यामधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सदरची घटना समजताच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन हे कृत्य करणार्‍या नराधमाला लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे आदेश रायगड जिल्हा डीवायएसपी अनिल पारसकर यांना देण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *