कोरोना काळात विशेष कामगिरी बजावणा-या प्रशासकीय अधिका-यांचा विशेष सन्मान

514
घोडेगाव,ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : ” कोरोनाची लढाई ख-या अर्थाने शिखरावर पोहचली आहे. आपल्याकडे कोरोना येणार नाही. आपण सुरक्षित आहोत असे कोणी समजु नये. जुलै महिन्यामध्ये रूग्णांची हळूहळू वाढ होत गेली आहे. जागतिक वैदयकिय क्षेत्रातील तज्ञांच्या मते जागतिक महामारी येते त्यावेळी त्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. त्यामुळे हे कोरोनाचे संकट दोन तीन महिन्यांत संपणारे नाही. यासाठी मास्क, सोशल डिस्टिंग पाळावे, सॅनिटायझर वापर करावा,” असे आवाहन आंबेगाव जुन्नरच्या प्रभारी प्रांत तथा आंबेगाव तहसीलदार रमा जोशी यांनी केले.
                               लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात विशेष कामगिरी बजावणा-या प्रशासकीय अधिका-यांचा विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी रमा जोशी बोलत होत्या. यावेळी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आंबेगाव जुन्नरच्या प्रभारी प्रांत तथा आंबेगाव तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके, सुरेश भोर, जिल्हा परीषद सदस्य व गटनेते देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखिले, राजाराम बाणखेले, सुनिल बाणखेले, अरूण गिरे, शिवाजी राजगुरू आदि मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परीशद प्राथमिक शाळा लांडेवाडी येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसामित्त रक्तदान शिबिर, शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये अडीच हजार मोफत किराणा साहित्यांचा वाटप शुभारंभ, १०१ रक्तदात्यांची मोफत कोरोना ऑंन्टीजेन रॅपीड टेस्ट, मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप, कोरोना काळात आरोग्य सेवेत महत्वाची कामगिरी बजावणारे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक प्रतिनिधी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गेली चार महिने कोरोना काळात विशेष कामगिरी बजावणा-या प्रशासकीय अधिका-यांचा विशेष सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *