मुरबाड,ठाणे : मुरबाडकराना भेडसावणाऱ्या समस्या न सोडविल्यास नगरपंचायत विरोधी घंटानाद आंदोलनाचा मुरबाड शहर मनसेचा इशारा

535
              मुरबाड,ठाणे : मुरबाडकरांना भेडसावणाऱ्या समस्या मुरबाड नगरपंचायतीने येत्या 15 दिवसात न सोडविल्यास मुरबाड मनसे नगरपंचायत विरोधी घंटानाद आंदोलन करेल असा  इशारा एका निवेदना द्वारे  दिला आहे.मुरबाड मनसेने नागरिकाना भेडसावणाऱ्या समस्या मध्ये शहरातील तीन  हात नाका ते मुख्य बाजारपेठ रस्त्या मधोमध असलेले धोकादायक विजेचे पोल काढुन रस्स्त्याच्या दुतार्फा लावण्याबाबत, मुख्य बाजारपेठ रस्त्या दरम्यान महिंलासाठी शौचालय उभारण्याबाबत,फुटपाथ मोकळे करणे, पार्कीगची योग्य व सुरक्षित सोय करणे, गणेशोत्सोवाच्या काळात विसर्जन सुविधांवर झालेल्या आनाठायी खर्चाबाबत चौकशी करणे,शेळकेपाडा अंर्तगत रस्त्याची दुरुस्ती करणे, जँमर खरेदीवर झालेल्या खर्चाची चौकशी करणे, व आता पर्यत वृक्ष  लागवडी वर एकुण झालेल्या खर्चाची चौकशी करण्याबाबत या व इतर अनेक अनेक समस्यांचे निवारण करण्याकरिता अनेक पत्रव्यवहार व आंदोलने केली.मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपंचायत प्रशासनाने या कडे कायम दुर्लक्ष केले. मात्र येत्या १५ दिवसाच्या आत वरील समस्यांचे निवारण न केल्यास नगर पंचायत कार्यालयासमोर बेमुदत घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा मुरबाड मनसे शहर कमिटीने  दिला आहे.
               याबाबतचे निवेदन मुरबाड मनसे शहर कमेटीने नगरपंचायतीचे अधिकारी संदीप कांबळे याना देवुन आता पर्यत मागण्या बाबत केलेल्या पुर्ततेत कशी  दिशाभुलकेली याची जाणीव ही करुन दिली. यामुळे नगरपंचायतीला या पुढे अडचणीना  सामोरे जावे लागेल असा इशारा ही देण्यात आला .
– प्रतिनिधी,जयदीप अढ़ाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *