पुणे शहरात महापालिकेकडून आता  ७५ प्रतिबंधित क्षेत्र – आयुक्त विक्रम कुमार

329

   पुणे : (प्रतिनिधी,सचिन दांगडे) – महापालिकेने शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची (कंटेन्मेंट झोन) पुनर्रचना केली आहे. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर घोषित केलेल्या 87 प्रतिबंधित क्षेत्रांमधून 12 क्षेत्र कमी झाले असून आता शहरात एकूण 75 प्रतिबंधीत क्षेत्रांची घोषणा पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी केली.लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक कोरोना बाधित सापडत होते. त्यामुळे कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी 13 ते 23 जुलै दरम्यान दहा दिवसात शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आला. या कालावधीत शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या कमी झाल्याचे प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रावरून समोर आले आहे. लॉकडाऊन घोषीत करण्यापूर्वी शहरात 109 प्रतिबंधीत क्षेत्रे होती. या प्रतिबंधीत क्षेत्रातून 22 क्षेत्रे वगळून ती 87 झाली.महापालिका प्रशासनाने या प्रतिबंधीत क्षेत्रांचा आढावा घेऊन 1 ऑगस्ट रोजी शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांची पुनर्रचना केली. यामध्ये पालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 75 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली. प्रशासनाने मागील प्रतिबंधीत क्षेत्रातून 12 क्षेत्र वगळल्याचे समोर आले. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक 11 प्रतिबंधीत क्षेत्र असून त्यानंतर ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत 8 प्रतिबंधीत क्षेत्र आहेत. तर सर्वात कमी प्रतिबंधीत म्हणजे प्रत्येकी 1 प्रतिबंधीत क्षेत्र कोंढवा व औंध बाणेर क्षेत्राय कार्यालयांतर्गत आहे.

याशिवाय हडपसर मुंढवा, येरवडा-कळस-धानोरी, वारजे-कर्वेनगर, कोथरूड-बावधन या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक प्रतिबंधीत क्षेत्र आहेत.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या

नगररोड-वडगाव शेरी – 11
शिवाजीनगर-घोले रस्ता – 08
हडपसर-मुंढवा – 07
ढोले पाटील – 06
येरवडा-कळस-धानोरी – 06
वारजे-कर्वेनगर – 06
कोथरूड-बावधन – 06
कसबा-विश्रामबाग – 05
वानवडी-रामटेकडी – 05
बिबवेवाडी – 04
भवानी पेठ – 03
धनकवडी-सहकारनगर – 03
सिंहगड रोड – 02
कोंढवा-येवलेवाडी – 01
औंध-बाणेर – 01

तारीख – प्रतिबंधित क्षेत्र संख्या

2 जून – 63
16 जून – 73
24 जून – 74
1 जुलै – 109
23 जुलै – 87
01 ऑगस्ट – 75




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *