शिक्रापूरच्या उपसरपंचपदी जयश्री दोरगे यांची निवड

350

   शिक्रापूर ता. शिरुर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड ) – शिरुर तालुक्यात अत्यंत  महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या  शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री  दोरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास आधिकारी बी.बी.गोरे यांनी दिली. शिक्रापूर ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी गटाचे ९ तर विरोधी गटाचे ८ असे बलाबल आहे .उपसरपंचपदासाठी जयश्री दोरगे व निलेश थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले .यामध्ये दोरगे यांना ९ तर थोरात यांना ८ मते पडली .दोरगे यांना ९ मते पडल्याने त्यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले . यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूकीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात जि.प सदस्या रेखाताई बांदल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर,पदाधिकारी उपस्थित होते . गावातील विकासकामे करण्यासाठी या पदाचा पुरेपूर उपयोग करणार असल्याचे दोरगे यांनी सा. समाजशील प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *