अलिबाग एस टी आगारातील 31 कर्मचा-यांचे निलंबन – निलंबित कर्मचा-यांनी त्याच्या अडचणी लेखी स्वरुपात कळवल्या नसल्याने कारवाई केली – अनघा बारटक्के, विभागीय वाहतुक नियंत्रक

579
             अलिबाग,रायगड : (प्रतिनीधी,सारिका पाटील) – कोवीड – १९ लाँकडाऊन दरम्यान आत्यावश्यक सेवेत कामावर रुजु न झाल्याने अलिबाग आगारातील 31 कर्मचा-यांना निलंबित करण्याची कारवाई राज्य परिवहन मडंळाच्या रामवाडी येथील विभागीय वाहतुक अधीक्षकांंनी केली आहे. दि. 31 जुलै रोजी तसे पत्र सबंधीत कर्मचा-यांना व अलिबाग आगार प्रमुखांना व वरिष्ट कार्यालयाला पाठविण्यात आले असले तरीही 31कर्मचा-यांवर अनिश्चित काळासाठी निलबंनाची कारवाई करण्यात आल्याचे पत्रात्र नमुद करण्यात आले आहे.
               राज्यासह जिल्ह्यातील एस टी सेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आल्या मुळे एस टी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार नाहीत. तसेच जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार आतंरजिल्हा प्रवासी वाहतुक बंद असल्याने आपण कामावर हजर झालो नाही त्यामुळे आमचे निलंबंन करुन आमच्यावर अन्याय झाला असुन आम्हाला त्वरीत कामावर घ्यावे अशा मागणीचे निवेदन निलंबित कर्माचा-यांनी अलिबाग आगार प्रमुखांने दिले. तत्पुर्वी निलंबित कर्मचा-यांनी अलिबाग स्थानकामध्ये पत्रकारांसमोर आपल्या व्यथा माडंल्या.
                अलिबाग आगाराने पनवेल, मुंबई सेवा देण्याचे योजले आहे.  मात्र पनवेल मध्ये कोविडचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी एस टी कर्मचारी वर्ग तयार होत नाहीत. तर अलिबाग ते दादर, मुंबई चालेल पण पनवेल नको अस त्यांचे म्हणणं असल्यानेच अलिबाग पनवेल साठी कर्मचारी टाळाटाळ करत असल्याचेही कर्मचा-यांचे म्हणणे आहे.
                  त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर निलंबनाची आज कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १५ चालक व १६ वाहकाचां समावेश आहे.  तसेच निलंबन अन्यायकारक असल्याचा कर्मचा-यांनी  दावा केला असुन जिल्हाधिकारी यांची आंतर जिल्हा वाहतुकीस बंदी असल्याने त्यांनी ड्युटी करण्यास नकार दिला तसेच 3 महिने पगार नाही,कर्जबाजारी झालो असून जर आत्ता नोकरी गेली तर कुठे जाणार असा सवाल त्यांनी केला आहे.
आत्यावश्यक सेवे दरम्यान पेण, कर्जत व अलिबाग येथुन पनवेल व दादर कडे बसेस सोडण्यात येतात. मागील कित्येक दिवस पेण व कर्जत आगारातील कर्मचारी आत्यावश्यक सेवेत रुजु आहेत. तसेच अलिबाग तालुका सुद्धा मुबंई महानगर प्रदेश अतंर्गत येत असल्याने अलिबाग येथुन पनवेल , दादर सेवा सुरु करण्यात आल्यानेच अलिबाग कर्मचा-यांना कामावर बोलवाले असता त्यांनी काम करण्यास नकार दिल्यानेच 31 कर्मचा-यांवर निलबंनाची कारवाई करण्यात आल्याचे विभागीय वाहतुक अधीक्षक श्रीमती अनघा बारटक्के यांनी सांगितले.  तसेच या कर्मचा-यांवर ९० दिवसांकरीता निलबंनाची कारवाई करण्यात आली असुन त्यांनी त्याच्यां अडचणी लेखी स्वरुपात कार्यालयात माडंव्यात  त्यावर निर्णय घेण्यात येईल असेही बारटक्के यांनी पुढे सांगितल्याने कर्मचारी व व्यवस्थापन याच्यांतील वाद काय वळण घेते या कडे जिल्ह्यातील कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *