कवठे येमाईत आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह – रुग्ण संख्या २ – डॉ.राजेश कट्टीमणी 

1007
            शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे कोरोनाचा संसर्ग वाढत असून येथील कोरोना बाधित रुगणाच्या बहिणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तीला काल शुक्रवार  दि. ०७ ला उपचारासाठी मलठण कोविड सेंटरला दाखल करण्यात आले असल्याची माहिती कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमणी यांनी दिली. तर रुग्नाच्या नजीकच्या इतर ९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना हायसे वाटले आहे.
         तरी ही शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील कवठे येमाई,मलठण परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय घरा बाहेर पडू नये, सॅनेटाईझरचा वापर करावा,हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत, संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून नाक व तोंडावर मास्क,रुमाल यांचा वापर करावा तसेच एकमेकांशी बोलताना काळजी घेत, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन डॉ.कट्टीमनी यांनी केले आहे. सर्दी,खोकला,घसा खवखवने,तापाची लक्षणे जाणवल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन उपचार घ्यावेत असे आवाहन ही डॉ.कट्टीमनी यांनी केले आहे.
            याच पार्श्वभूमीवर कवठे येमाई गावात ७ दिवस कडकडीत व पुढील ७ दिवस असा १४ दिवसांचा बंद प्रशासनाने घोषित केलेला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात तात्काळ प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली असून कोरोनाचा संसर्ग गावात अधिक वाढू नये म्हणून विनाकारण बाहेर न फिरता घरीच थाबावे. गावातील व्यावसायिकांनी, ग्रामस्थांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सरपंच अरुण मुंजाळ,व ग्रामपंचायत प्रशासनाने  केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *