बारवीधरण विस्थापित व बधितांतील वंचितांना खावटी द्या-आरपीआय सेक्युलरची मागणी 

460
             मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) –  मुरबाड बारवीधरण विस्थापित व बधितांमधील वंचितांना खावटी देण्याची मागणी आरपीआय सेक्युलर ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी कार्यकारी अभियंता औद्योगिक विकास महामंडळ मुरबाड यांचे कडे एका निवेदना तुन केली आहे .
         मुरबाड तालुक्यातील बारवीधरण विस्थापित व बाधित गाव तसेच आदिवासी वस्त्या मौजे कोळे- वधखळ ,काचकोली, जांभुळ वाडी , पारधवाडी, वरुडवाडी, मोहघर व तळ्याची वाडी अश्या वाड्या वस्त्या बारवी धरणांनाच्या वाढीव उंची मुळे बाधित आहेत .असे असताना औद्योगिक विकास महामंडळ  या गावांना मूलभूत सुविधा देण्यास अकार्यक्षम ठरत आहे .मौजे कोळे वडखळ च्या पुनर्वसन चा प्रश्न प्रलंबित आहे तर तळ्याची वाडी येथे आज पर्यंत दळणवळण ची व्यवस्था करण्यात अपयश आले असताना या ठिकाणचे अनेक नागरिक खावटी व इतर सुविधांपासून वंचित असून  औद्योगिक विकास महामंडळ स्वतः च्या व संघटनेच्या  मर्जीतील नागरिकाना खावटी वाटपाचे धनादेश देत आहेत असा आरोप रवींद्र चंदने यांनी केला आहे. महामंडळा कडे असलेल्या यादी व्यतिरिक्त नागरिक बाधित असताना खावटी व मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. नुकतेच कोळे वडखळ व तोंडली येथील बधितांना खावटी व घरभाडे महामंडळा कडून देण्यात आले.  मात्र यातील अनेक बधित वंचित असल्याने यानाही खावटी व मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी आरपीआय सेक्युलर कडून करण्यात आली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *