ज्योती सातव राज्यस्तरिय गुणवंत शिक्षक पुरस्काराणे सन्मानित 

503
       शिक्रापूर,शिरूर : (प्रतिनिधी ,राजाराम गायकवाड) –  महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देणा-या शिक्षकांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. याच अनुषंगाने दौंड तालुक्यातील वरवंड केंद्रांतर्गत वाबळे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सौ. ज्योती प्रमोद सातव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे.

ज्योती सातव या मागील एकवीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणा-या अडचणींचा अभ्यास करून त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध आधुनिक प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या सॄजनशिलतेला वाव देत आहेत. एखादा अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीने ज्ञानरचनावाद हसत खेळत विद्यार्थ्यांच्या पातळीवर येऊन समजाऊन सागण्याची सातव यांची हातोटी आहे. ज्योती सातव यांच्या आजवरच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.  शाल, श्रीफळ, पदक, प्रमाणपत्राने विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योती सातव यांना नुकतेच गौरविण्यात आले आहे. सातव यांना मिळालेल्या पुरस्काराने पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *