सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी यासाठी कलाकारांचे आमरण उपोषण

304

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : लॉकडाऊनमुळे सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्यामुळे कलाकार व इतर बॅक स्टेज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकारांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी अभिनेते कुमार पाटोळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. महाकला मंडळ मधील कलाकारही यामध्ये सहभागी झाले आहेत. हे आंदोलन बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होत असून, महामंडळ या राज्याची शिखर संघटनेच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले व कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ऍड मंदार जोशी,अशोकराव जाधव-अध्यक्ष कलाकार केंद्र असोसिएशन हे पाटोळेंच्या सोबत या उपोषणाला बसून पाठिंबा दिला. अशा महाकला मंडळाच्या मागण्या आहेत या सरकारने मान्य कराव्यात व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी हि प्रमुख मागणी आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *