द्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी विरोधात घोडेगाव तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध आंदोलन

347
 घोडेगाव,ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : केंद्र सरकारची आर्थिक स्थिती ढासळलेली असल्याने त्याच्या परिणामांचा आपणांस त्रास होणार आहे. ही आर्थिक व्यवस्था सांभळत असताना सर्वाधिक जास्त कर्ज बुडवे, ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले, ज्यांनी बॅंका लुटल्या, देश सोडून गेले अशा मोठया उदयोगपतींवर कारवाई न करता शेतक-यांवर अन्याय करणा-यांचा निषेध व्यक्त करत केंद्र सरकारने कांदयावरील निर्यात बंदीचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा. तसेच केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला असला तरी राज्य सरकार शेतक-यांच्या बाजुने उभे असल्याचे, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी विरोधात घोडेगाव तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आढळराव पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनिल बाणखेले, जिल्हा परीषद गटनेते देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखिले, राजाराम बाणखेले, अलका घोडेकर, मालती थोरात, अरूण गिरे, सुरेश भोर, कल्पेशअप्पा बाणखेले, तुकाराम काळे, सचिन बांगर, मिलींद काळे, राजाभाउ काळे, शिवाजी राजगुरू, अमोल काळे, प्रशांत काळे, उल्हास काळे, विजय घोडेकर, स्वप्निल सैद उपस्थित होते. शेवटी तहसिलदार रमा जोशी यांना निवेदन देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटनेकडून कुठल्याही प्रकारचे दडपण नसताना केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. एका बाजुला कोरोनाचे संकट तर दुसरीकडे शेतमालाला बाजार भाव मिळत नाही. या सर्वांवर मात करून जो कांदयाला चांगला बाजार मिळत होता. त्याच कांदा निर्यातीवर बंदी आणली. शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय घातक निर्णय आहे. पुणे जिल्हयातील शेतक-यांसाठी हा चुकीचा निर्णय आहे. परतीच्या पावसानेही सातगाव पठार व इतर भागातील शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. यातच शेतक-यांच्या दुधालाही बाजार भाव नाही, दुधाला बाजार भाव वाढेल या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. माझ्या दृष्टीने सत्तेपेक्षाही शेतकरी महत्वाचा आहे. त्यामुळे काही दिवसांत दुधाचे दर वाढले नाहीत तर याच ठिकाणी आंदोलन केले जाईल, असे आढळराव पाटील यांनी सांगितले. शेतकरी व इतर नागरिकांवर अन्याय होतो त्यावेळी शिवसेना धावून जाते. शिरूर मतदार संघाचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील गेली तीन वेळा खासदार असताना केंद्रामध्ये शेतक-यांना अडीअडचणी येतील, अन्याय होईल त्यावेळी आवाज उठविण्याचे काम आढळराव पाटील यांनी केले. तर ज्या शेतक-यांच्या जीवावर देश चालत असताना या शेतक-यांच्या बाजुने हे भाजप सरकार उभे राहत नसल्याचा आरोप जिल्हा परीषद गटनेते देविदास दरेकर यांनी केला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *