मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील कामगार भीतीच्या सावटाखाली  

976

केंद्र सरकारच्या नवीन कामगार विधेयकामुळे कामगार चिंतेत  

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठा गृप असलेल्या टेक्नोक्रप्ट  इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड कंपनीने आपला स्वतःचा वीज निर्मिती करणारा पावर डिव्हिजन दि 25 सप्टेंबर 2020 पासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेऊन या डिव्हिजन मध्ये काम करणाऱ्या सर्व कायम कामगारांना कायदेशीर रित्या पोस्टाने घरपोच हिशोब देऊन काढून टाकल्याने याचे परिणाम मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील इतर कामगारांवर झाला आहे. या धक्कादायक निर्णयामुळे कामगार वर्ग भीतीच्या सावटाखाली असून केंद्र सरकारच्या नव्या कामगार विधेयकामुळे चिंताग्रस्त झाले आहेत.
मुरबाड औद्योगिक क्षेत्रात 350 च्या आसपास छोटे मोठे कारखाने आहेत, मुरबाड औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होऊन 35 वर्ष झाली मुरबाड चे भाग्यविधाते काँग्रेस चे माजी महसूल मंत्री शांतारामभाऊ घोलप यांच्या प्रयत्नातून ही औद्योगिक नगरी सुरू झाली. आज मितीस गेल्या पाच वर्षात यातील अनेक कारखाने सरकारच्या आर्थिक धोरण व दळणवळणा मुळे बंद झाले. तर काही मोजक्या कंपन्या मध्ये तीनशे पेक्षा जास्त कामगार आहेत. काही छोट्या कंपन्या मध्ये तीनशे पेक्षा कमी कामगार असून, त्यातील काही कामगार कायमस्वरूपात आहेत. मात्र नुकताच केंद्र सरकारने नवीन कामगार विधेयक मंजूर केले. यात नव्या कायद्यानुसार “कायमस्वरूपी कामगारांना कंपनीला कंत्राटी ठेवण्याची मुभा त्याच प्रमाणे तीनशे पेक्षा कमी कामगार असतील तर त्यांना कधीही कामावरून कंपनी काढू शकते ” याच विधेयकाची मुरबाड मधील सर्वात मोठया टेक्नोक्रप्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड कंपनीने मुरबाड औद्योगिक क्षेत्रात आपला पावर डिव्हिजन कायमस्वरूपी बंद करून कामगारांना बेकारीच्या खाईत लोटले, यामुळे मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील कामगार भीतीच्या सावटाखाली आहेत. कामगार वर्ग जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यात सरकारच्या नव्या कामागार धोरणा मुळे कंपनी मालकांना संधी मिळाली असल्याने मोठया प्रमाणात या विधेयकाची अंमलबजावणी कारखानदार करू शकतात. त्यामुळे बेकारीच्या संकटाने कामगार वर्ग चिंतीत झाला असून कामगार क्षेत्रातून या विधेयकाला विरोध होताना दिसत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *