मुरबाड,ठाणे : मुरबाड पोलिसांपुढे गाड्यांचे चाके चोरणाऱ्या चोरांचे आव्हान, उभ्या गाड्याच्या चाके चोरीच्या वाढत्या घटना

1016
              मुरबाड,ठाणे : मुरबाड परिसरात दुचाकी- चारचाकी वाहनाच्या चाके चोरीचे प्रमाण वाढले असुन या चोरट्यानी मुरबाड पोलिसांपुढे एक प्रकारे आव्हानच उभे केले आहे.मुरबाड मध्ये  रघुनाथ टोहके यांच्या कार चे मागचे दोन चाके काल रात्री चोरट्याने पळविल्याने वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.यापुर्वी शहरातील बाजार समितीच्या मार्केट परिसरात उभ्या असलेल्या सिध्दार्थ धनगर यांच्या स्कार्पिवो गाडीचे चारही चाके चोरट्यानी लंपास केले होते,पत्रकार अरुण ठाकरे यांच्या अँव्हनजर मोटरसाइकल चे चाक चोरीस गेले होते तर अनेक सोसायट्या मधील वाहनाची चाके चोरीस गेल्याच्या घटना घडल्या.  पोलिसात तक्रारी ही  झाल्या.  मात्र या पैकी एकाही चोरीचा तपास न लागल्याने या वाहन चालकानी नाराजी व्यक्त केली.  तर रात्री पुन्हा अशीच घटना घडल्याने एक प्रकारे या चोरांनी पोलिसांसह  वाहन मालकानाही आव्हान उभे केले आहे.
   मुरबाड मध्ये आता पर्यत चाके चोरीच्या घटनेत महागड्या व लवकर न मिळणाऱ्या चांकाच्या चोऱ्या झाल्या पोलिसात तक्रार होते.  पण शोध लागत नाही तर गस्ती पथकालाही कधी अश्या घटना निर्दशनास न आल्याने चोरट्यानी चांगलीच दहशत निर्माण केल्याने मुरबाड मध्ये या चोरट्यानी पोलींसाना आव्हान तर नागरीकांमध्ये  दहशत निर्माण केली आहे
– प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *