उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुरबाड पोलिसांना निवेदन

597

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा काल दिल्ली येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा व उत्तर प्रदेश पोलिसांची भूमिका याचा जाहीर निषेध करत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या संदर्भात मुरबाड मध्ये आरपीआय (सेक्यु) ने  मुरबाड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांना निवेदन  देऊन या पीडिताला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली. सदर घटना तमाम भारतीयांच्या व आम्हा दलितांच्या भावनेला ठेच पोहचविणारी तसेच मानवतेच्या दृष्टीने निंदनीय या घटनेचा जाहीर निषेध करणारे निवेदन दिले. यावेळी आर.पी.आय. सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदणे, मुरबाड तालुका युवक अध्यक्ष राजेश गायकवाड, तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष निखिल अहिरे, शहर युवक अध्यक्ष रामू टंटोळे, दिलीप चंदणे, से.सं.सदस्य विनय चंदणे, शहर सचिव अविनाश रातांबे सामाजिक कार्यकर्ते अनिल रील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *