महावितरणच्या टाकळी हाजी कार्यालयात प्रदीप पारखे यांची शाखा अभियंता म्हणून नियुक्ती 

485
              शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील महावितरणच्या टाकळी हाजी क्षेत्रीय कार्यालयात प्रदीप पारखे यांची शाखा अभियंता म्हणून नव्याने नियुक्ती झाली असून त्यांनी आपला पदभार नुकताच स्वीकारला. येथील शाखा अभियंता दीपक पाचुंदकर यांची इतरत्र बदली झाल्याने पारखे यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे.कार्यालयीन कर्मचारी व राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा मुख्य संघटक,जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांच्या हस्ते पारखे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
             टाकळी हाजी महावितरण कार्यालयात पदभार स्वीकारलेले प्रदीप पारखे यांनी कार्यालया अंतर्गत असलेल्या वीज ग्राहकांच्या अडचणी,समस्या समजून घेऊन त्या त्वरेने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असे अश्वासन दिले. शेतीपंप,घरगुती वीज ग्राहकांनी देखील महावितरणला वीजबिले वेळोवेळी भरून सहकार्य करण्याचे आवाहन पारखे केले आहे. यावेळी फोरमन गोडे,लाईनमन गेंजगे,अनिल गोबाळे,सुरेश पवार,अमोल दुधे,अशोक अरण्ये,नवनाथ गावडे,संदीप गावडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *