निमगाव दुडे गावच्या उपसरपंचपदी पवित्रा दुडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना उपस्थित मान्यवर

निमगाव दुडेच्या उपसरपंचपदी पवित्रा दिपक दुडे पाटील यांची बिनविरोध निवड

892
              शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे गावच्या उपसरपंच पदी आज  पवित्रा दिपक दुडे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कौशल्या गजानन पानगे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक सरपंच अश्विनी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे ,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे,सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे ,पंचायत समितीच्या सदस्य अरुणाताई घोडे, रावडेवाडीचे सरपंच गबाजी पिंगट, सासरचे सरपंच दिलीप चासकर, माजी सरपंच कविता पानगे, चेअरमन विजय दुडे,गोविंद नरवडे ,दीपक दुडे, संजय पानगे जालिंदर पानगे गणेश सरोदे ,अमोल घोडे, मकरंद घोडे, भाऊसाहेब दुडे,विशाल रावडे ,भिकाजी पानगे ,साळभाऊ पानगे, दत्ता दुडे,ग्रामसेविका शीला साबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
           यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे म्हणाल्या की, गावच्या विकासासाठी योग्यतो निधी उपलब्ध करून दिला जाईल.नवनिर्वाचित उपसरपंच पवित्रा दुडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .निवडीनंतर पवित्रा दुडे यांनी सर्वांच्या मदतीने व सहकार्यातून गावातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे अश्वासन दिले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *