रांजणगाव परिसरातून मोबाईल चोरणारी चार जणांची टोळी गजाआड – स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

491

शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याअंतर्गत मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या फरारी आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे स्थानिक गुन्हे शाखेने ४ आरोपीना जेरबंद केले असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने गुन्ह्यातील चोरीचे ४ मोबाईल असा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

            सदर गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.आदर्श गहिनीनाथ हुलगे ,वय 20 वर्षे रा मु पो टाकळी ,ता माढा जि सोलापूर,उत्कर्ष भीमराव बनसोडे वय 19 वर्षे रा न्यू बालाजी नगर उमरगा जि उस्मानाबाद, महादेव शंकर जमादार वय 22 वर्षे रा हनुमान नगर उमरगा जि उस्मानाबाद, श्रींनिवास जनार्दन माने पाटील,वय रा औटी प्लॉट उमरगा ता उमरगा जि उस्मानाबाद या ४ जणांना मोबाईल चोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

              याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार काल दि १ नोव्हेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक  पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पाहिजे असलेल्या फरारी आरोपींचा शोध घेत असताना व रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार रांजणगाव पोलिस स्टेशन गु र न ३२२/२०२० भा द वि का कलम 380 नुसार दाखल गुन्ह्यात एकूण वेगवेगळ्या कंपनीचे 3 मोबाईल किंमत रु १८,००० असे चोरीस गेले होते. यातील १ मोबाईल आदर्श गहिनीनाथ हुलगे वय 20 वर्षे रा मु पो टाकळी ता माढा जि सोलापूर हा वापरत असल्याचे समजताच पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ. देशमुख,अपर पोलीस अधीक्षक सो बारामती मिलिंद मोहिते,उपविभागीय अधिकारी राहूल धस,वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे ,सहा फो दत्तात्रय गिरीमकर,पो हवा अनिल काळे, रविराज कोकरे , ज्ञानेश्वर क्षिरसागर,पो ना अभिजित एकशिंगे, प्रवीण मोरे, राजू मोमिन, विजय कांचन ,पो कॉ धिरज जाधव , पो हवा काशीनाथ राजापूरे हे पोलीस पथक सोलापूर येथे जाऊन आदर्श यास  ताब्यात घेतले असता त्याच्याकडे सदर मोबाईल बाबत चौकशी करून त्याला  पोलीस खाक्या दाखवताच सदरचा मोबाईल हा त्याने त्याचे इतर मित्रांच्या सोबत रांजणगाव येथून चोरून आणल्याचे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. इतर ३ मोबाईल हे मित्रांकडे असल्याचे सांगितले. यावरून पोलीस पथकाने भीमराव बनसोडे वय 19 वर्षे रा न्यू बालाजी नगर उमरगा जि उस्मानाबाद ,महादेव शंकर जमादार वय 22वर्षे रा हनुमान नगर उमरगा जि उस्मानाबाद ,श्रींनिवास जनार्दन मानेपाटील वय रा औटी प्लॉट उमरगा ता उमरगा जि उस्मानाबाद  यांना ताब्यात घेतले असता दाखल गुन्ह्यातील गेलेले 3 मोबाईल एकूण किंमत रु १८००० इतर 1 मोबाईल असे एकूण 4 मोबाईल मिळून आले आहेत.  गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल तसेच वरील ४ इसम यांनी चोरून नेल्याचे सांगितल्यावरून वरील आरोपींची वैद्यकीय तपासणी करून गुन्ह्यातील मुद्देमाल सहित त्यांना पुढील तपासाकामी रांजणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत करीत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *