न्हावरे या घटनेतील महिलेचे डोळे निकामी करणाऱ्या आरोपीला अटक

542

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे याठिकाणी शौचालयाला गेलेल्या महिलेचे डोळे निकामी करणाऱ्या आरोपीला शिक्रापूर चाकण चौकामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक करण्यात यश आले आहे. न्हावरे या ठिकाणी 3 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता च्या सुमारास पीडित महिला शौचालयाला गेले असता अज्ञात इसमाने तिच्यावर ती विनयभंग करत तिचे डोळे निकामी करण्यात आले होते पीडित महिलेने केलेल्या वर्णनानुसार अनोळखी व्यक्ती बुटका तोंडाला लाल रंगाचा कपडा बांधीला इसम असून पीडित महिलेचा छेडछाडीचा काढून तिला मारहाण करून तिचे डोळे गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या बाबतचे शिरूर पोलीस स्टेशन भा दं वि कलम 307, 326, 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी व पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे शिरूर, शिक्रापूर भिगवण, यवत, बारामती तालुका, दौंड, इंदापूर या विविध पो.स्टे.चे पथक गुन्हयाचे तपासकामी बोलावून घेवून त्यांचा कामाची विभागणी करून जबाबदारी दिलेली होती.

त्यानुसार गुन्ह्याचा तपासकाम करणारे अधिकारी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखा पुणे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, शिरूर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण,सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, भिगवण पोलिस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक लांबोटी बारामती तालुका पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे शिरूर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे शिरूर पोलीस स्टेशन पोलीस, उपनिरीक्षक सुनील मोठे शिरूर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी शिक्रापूर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक गंपले यवत पोलीस स्टेशन ,महिला पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे दौंड पोलीस स्टेशन या या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *