तळेगाव ढमढेरे येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 130 वी पुण्यतिथी साजरी

382
           शिक्रापूर,शिरुर (प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तळेगाव ढमढेरे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवारातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला त्यांच्या १३० व्या पुण्यतिथी निमित्ताने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
            शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शिरूर तालुक्याचे आमदार यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा देत आज खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली .सामाजिक व आर्थिक विषमतेवर उभारलेले अर्थव्यवस्था मोडून त्या जागी समतेवर आधारलेली नव समाज निर्मिती व्हावी त्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्योतिराव फुले लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते होते. लोकशाही ही लोक प्रणाली व्हावी गरीब-श्रीमंत, मालक- मजूर ही मांडणी लोकशाही प्रणालीत बदलू शकते. यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा समाजपरिवर्तन न्यायाधिष्ठित समाज निर्मिती या गोष्टी लोकशाहीच घडू शकते. त्यात कोणालाही अमर्याद स्वातंत्र्य नसते. जाती धर्माला विरोध करणे   आचार- विचार स्वातंत्र्य अंधश्रद्धेचे उद्घाटन ही मूलभूत तत्वे त्यांनी अंगिकारली ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा पगडा घेऊन आज समाजाची प्रगती करण्याची खरंच गरज असल्याचे मत आमदार अशोक बापू पवार यांनी व्यक्त केले.
             यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर दादा जांभळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नाना नरके, उपसभापती अनिल भुजबळ, विद्याताई भुजबळ, पोपट भाऊ भुजबळ विश्वास काका ढमढेरे,  विजय ढमढेरे,अँड दिपक ढमढेरे. सुहास ढमढेरे,संभाजी ढमढेरे, सुदीप गुंदेचा,गणेश शेठ तोडकर माऊली भुजबळ व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *