मुरबाड मध्ये रस्त्या साठी अनोखे आंदोलन ; तालुक्यातील नागाव रस्ता त्वरीत दुरुस्त न झाल्यास आत्महत्या आंदोलना चा इशारा

374

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील नागावं रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी अनोख्या आंदोलनाचा  इशारा दिला आहे. आत्महत्त्या आंदोलनाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला असून, अश्या प्रकारच्या इशारा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वत्र जोरदार या आंदोलना ची चर्चा सुरू आहे. मुरबाड तालुक्यातील अनेक जोडरस्ते हे शेवटच्या घटका मोजताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 61 वरील सरळगाव बाजारपेठपासुन नागावं या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गेली अनेक वर्षे हा रस्ता दुर्लक्षितच राहिला आहे. याच रस्त्यात शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांचे कृषी महाविद्यालय आहे. त्यामुळे या रस्त्याने जाताना या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. या रस्त्यावर सध्या सर्वत्र खड़ी व मोठमोठे दगड बाहेर पडले आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी तसेच शासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा. जर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड यांनी त्वरित सुरू न केल्यास आत्महत्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. आतापर्यंत आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, मोर्चा, धरणे आंदोलन, साखळी उपोषण, रस्ता रोको असे अनेक आंदोलन नागरिकांनी पाहिलेत पण भरत दळवी यांचे आत्महत्या आंदोलन चर्चेचा विषय बनला असून, नव्या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी हे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अनोख्या आंदोलन इशाऱ्यामुळे प्रशासन ही कामाला लागले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *