विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

387
कोरेगाव भीमा,ता.शिरूर (-प्रतिनिधी, गजानन गव्हाणे) : एक जानेवारी रोजी पेरणे फाटा, ता. हवेली येथील विजयस्तंभावर शौर्य दिनाचे निमित्ताने होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राने कंबर कसली असून, या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी आरोग्य विभाग तत्पर असल्याची माहिती पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरेश लोहार आणि डॉ. प्रियांका कोलते – सातव यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने प्रत्येक वर्षी पेरणे विजयस्तंभावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. परंतु यंदा कोरोनामुळे फक्त पासधारक लोकांनाच प्रवेश दिला जात असला तरी ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजनात 6 ठिकाणी कॅम्प लावून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये विजयस्तंभावर तीन ठिकाणी, पेरणे फाटा, तुळापूर फाटा तसेच पेरणे आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी रुग्णांची तपासणी करणार आहेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमारे वस्ती, पेरणे फाटा या ठिकाणी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची अँटीजन कोविड टेस्ट करण्यात येणार आहे. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लोकांची थर्मल सकॅनिंग करण्यात येणार आहे.  यासाठी 6 वैद्यकीय अधिकारी व इतर 49 लोकांची यंत्रणा सज्ज आहे. तरी येणाऱ्या प्रत्येकाने थर्मल स्कॅनिंग व आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. लोहार व डॉ. कोलते – सातव यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *