सणसवाडीत दहावी जागाही बिनविरोध ; प्रियांका गणेश दरेकर बिनविरोध

395

सणसवाडी, ता.शिरूर (-प्रतिनिधी, झानेश्वर मिडगुले) : सोन्याची वाडी समजल्या जाणाऱ्या सणसवाडीत आधी ९ जागा बिनविरोध झाल्या होत्या व आता दहावी जागाही बिनविरोध करण्यात आली असून उर्वरीत बाकी सर्व जागाही बिनविरोध होण्यासाठी हालचाली सुरु असल्याचे समजते. वॉर्ड नं. २ मधून पहिलेच राजेंद्र सुदाम दरेकर व संगिता नवनाथ हरगुडे यांना बिनविरोध निवडून आले होते. तनुजा तानाजी दरेकर यांनी माघार घेवून विरोधी प्रियांका गणेश दरेकर यांना बिनविरोध जाहिर केले. त्यामुळे बाकी राहिलेल्या दोन वार्डातही बिनविरोध करण्यासाठी गावातील वरिष्ठांचा विचारविनीमय चालू आहे .सणसवाडी, मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई , पिंपळे या ग्रामपंचायाती पुर्ण बिनविरोध होऊ शकतात. या ग्रामपंचायती निवडणूक पुर्ण बिनविरोध व्हाव्यात अशी कार्यकर्त्यांची व मतदारांची तिव्र भावना आहे. गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्यांनी सरपंचपदे वा अध्यक्षपदासारखी मोठी मोठी पद भुषविलीत त्यांनी साध्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी ग्राहक पंचायतचे अशोक दरेकर यांची रास्त मागणी आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *