भारतीय जनता पार्टी, सहकार आघाडी पुणे शहर वतीने आज  “मोफत कायदेशीर सल्ला केंद्र“ चे उदघाटन 

308

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) :आमदार जगदिश मुळीक शहराध्यक्ष भाजपा पुणे यांचे शुभहस्ते आज भारतीय जनता पार्टी, सहकार आघाडी पुणे शहर वतीने आज “मोफत कायदेशीर सल्ला केंद्र“ चे उद्घाटन भाजपा शहर कार्यालय, सन्मान हॅाटेल, पुणे येथे करण्यात आले. सर्वसामान्य पुणेकरांसाठी दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू करण्यात आला आहे. मान्यवर अभ्यासू कायदेपंडीतांचे मार्गदर्शन, गृहरचना सोसायट्या, नागरी पतसंस्था, सहकारी बॅका यासोबत कौटुंबिक आणि इतर योग्य विषयावर मोफत सल्ला दिला जाणार आहे. पुणे शहरात गृहनिर्माण संस्था ह्या १७९८४ इतक्या असुन, फक्त २४८२ संस्थांनी डीम्ड कन्व्हेअन्स करून घेतले आहे. २१२५ गृहरचना संस्थाना डीम्ड कन्व्हेअन्स लागु होत नसले तरी, बाकी ब-याच हजार संस्थांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि यासाठी भाजपा सहकार आघाडी आपल्याला मदत करेल. पुणेकरांनी या समाजोपयोगी उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदिश मुळीक यांनी केले आहे. दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भारतीय जनता पार्टी, पुणे शहर कार्यालय येथे हे मोफत कायदेशीर सल्ला केंद्र चालणार आहे. यासाठी सहकार आघाडी पुणे शहर यांनी तयार केलेल्या लिंकवर आपल्याला आपल्या संस्थेची अथवा वैयक्तिक माहिती, अडचणी यांची माहिती पाठवायची आहे . ती लिंक सोशलमिडीयाच्या विविध माध्यमातुन पुणेकरांपर्यत पोहचविणार असल्याचे अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी सांगितले. याप्रसंगी मा.आ.जगदीशजी मुळीक,अध्यक्ष भाजपा पुणे शहर, रविजी अनाजपुरे संघटन मंत्री, संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे, सरचिटणीस गणेशजी घोष, राजेशजी येनपुरे, प्रदेश सरचिटणीस सुशीलजी मेंगडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह नगरसेवक, शहर पदाधिकारी, सहकार आघाडीचे पदाधिकारी आणि विविध आघाडयांचे अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट, अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी, पुणे शहर यांनी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *