2020 ते 2025 ग्रामपंचायत आरक्षण जाही

331

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील 44 ग्रामपंचायती मधील एकूण 338 सदस्य संख्ये पैकी 178 ग्रामपंचायत सदस्य पूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. 39 ग्रामपंचायती मधील सुमारे 160 उमेदवारांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत 32 हजार 321 मतदारांपैकी स्रिया 12हजार 494 तर पुरुष 13 हजार 961 असे एकूण 26 हजार 455 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मुरबाड तालुक्यातील 39 ग्रामपंचायत मध्ये 81-84टक्के मतदान झाले होते. आज निवडून आलेल्या उमेद्वारांपैकी नेमका सरपंच कोण ? यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणे, तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत या सोडतीने शिक्का मोर्तब करण्यात आले आहे. यावेळी सोडत नुसार अनुसूचित जाती 3 (स्त्री राखीव 1, पुरुष 2), अनुसूचित जमाती 3 (स्त्री राखीव 2, पुरुष 1), नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबिसी) 19(स्त्री राखीव 10, पुरुष 9), सर्वसाधारण प्रवर्ग 19, असे आरक्षण जाहीर केले असून आगामी 25 ग्रामपंचायतींचेही आरक्षण यावेळी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे भावी सरपंचांची खुर्चीत बसण्याची प्रतिक्षा संपली आहे. मात्र या आरक्षण सोडती नंतर राजकिय पक्षाची दावेदारीसाठी हालचालींना वेग आला आहे. मुरबाड तालुक्यातील 44 पैकी 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. तर 39 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक झाली. त्यात निवडणूक निकलानंतर भाजप व शिवसेना यांनी 37 ग्रामपंचायतवर दावेदारी केली होती. मात्र सरपंच आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता खरी सत्यता बाहेर येणार असल्याने नव्या राजकिय गतीविधीना सुरूवात झाली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *