वडिलांचे स्वप्न निर्धाराने पूर्ण करण्याचा कन्या तेजस्विनीचा संकल्प – पत्रकार स्व.सतीश भाकरे यांना कन्या तेजुची वृक्षारोपण करुन भावपूर्ण श्रद्धांजली

1010

   शिरूर,पुणे : ( प्रा.सुभाष शेटे,कार्याकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील माळवाडी (टाकळी हाजी) येथील दैनिक पुढारीचे पत्रकार व पत्रकार योगेश भाकरे यांचे जेष्ठ बंधू सतीश सदाशिव भाकरे यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले.सर्वप्रिय असलेले पत्रकार भाकरे यांच्या सोज्वळ स्वभावाने त्यांचे असंख्य चाहते होते. त्यांच्या अचानक निधनाने अनेकांना तर मोठाच धक्का बसला.पण त्यांच्या कुटुंबाला तर त्या पेक्षा मोठा धक्का बसला. घरातील एकमेव कर्ता पुरुष गेल्याने मुले वडिलांची छाया व प्रेमासाठी पोरकी झाली.

भाकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांची १५ वर्षीय लाडकी कन्या तेजस्विनी हिने मात्र स्व.वडिलांचे स्वप्न निर्धाराने पूर्ण करण्याचा संकल्प त्यांच्या दशक्रियाविधी दरम्यान केला. म्हणूनच आता रडायचं नाही तर लढायचं असे भावपूर्ण उदगार तेजस्वीनीने व्यक्त केले.  माझे पप्पा एवढ्या मोठमोठ्या पुढारी आणि उद्योजक लोकांच्या संपर्कात असूनही त्यांना हार्ट अटॅक आल्यानंतर उपचाराची सुविधा जवळ उपलब्ध नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जी वेळ आमच्या कुटुंबावर आली ती केवळ आज गावात प्रशस्त हॉस्पिटल नसल्यामुळेच.  अशी वेळ कोणा शत्रुवरही येऊ नये. म्हणून माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे, की लवकरात लवकर एका प्रशस्त रुग्णालयाची सुविधा आपल्या गावात सुरू करण्यात यावी अशी मागणी तेजस्विनीने यावेळी केली. तसेच बालपणीच्या आठवणीही सांगत, सर्व मान्यवर मंडळींचे हात जोडून ऋण व्यक्त केले.                           स्व.पत्रकार सतीष सदाशिव भाकरे यांच्या दशक्रियेनिमित्त  विविध कार्यक्षेत्रातील असंख्य मान्यवर मंडळी उपस्थीत होते.त्यांच्या कुटुंबीयांना शक्य तितके आर्थिक सहाय्य करुन सर्व पत्रकार, नेते-कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी, मिञ आणि पाहुणे यांनी सतिष यांच्या मधुर वाणी, लेखणी, सामाजिक बांधिलकी आदी सद्गुणांचा गौरव करत श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी आमदार मा. अशोक पवार, मा. आमदार पोपटराव गावडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्तजी निकम, माजी सभापती मंगलदासजी बांदल, पं. स. सदस्या अरुणाताई दामुशेठ घोडे, पं. स. सदस्य डॉ. सुभाष पोकळे, मानसिंगभैया पाचुंदकर (राष्ट्रवादी अध्यक्ष), शिरूर,पारनेर,आंबेगाव तालुक्यातील अनेक पत्रकार, भीमाशंकरचे शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे,परागचे आढाव तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी सरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.सायंकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुकन्या तेजश्री हिने आजोबा दत्तात्रय किसन वाव्हळ (मा. चेअरमन,शिंगवे पारगाव ) आणि आत्या शोभा पांडुरंग मेहेत्रे यांच्या संकल्पनेतून कुटुंबासमवेत दारासमोर आंब्याचे झाड लावून आपल्या पप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली वहात त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *