मुरबाड,ठाणे : मुरबाड शहरात मटका, जुगार पाकोळी व्यवसाय तेजित, पोलिसांचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष असल्याचा मनसे मुरबाड शार अध्यक्ष नरेश देसले यांचा आरोप

954

   मुरबाड,ठाणे :  मुरबाड शहरात नगरपंचायत परिसरात मटका,जुगार, व पाकोळीचा अवैध धंदा जोरात सुरु असुन पोलिस यंत्रणा मात्र जाणिव पुर्वक याकडे कानाडोळा करत कारवाई टाळत असल्याचा आरोप मनसे मुरबाड शहराध्यक्ष नरेश देसले यांनी केला आहे.

           मुरबाड नगरपंचायतीची इमारत हि मुख्य बाजारपेठ रस्त्यावर असुन त्याच्या लगतच न्यु ईंग्लीश स्कुल ,राष्ट्रीय महामार्ग कार्यालय,जिल्हा परिषद विश्राम गृह, साईबाबा मंदिर, संतोषी माता मंदीर, तसेच भुमिअभिलेख  कार्यालय आहे शिवाय लोकवस्ती ही असल्याने या परिसरात मटका, जुगार,पाकोळी या सारखा अवैध धंद्याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याने या धंद्याला कुणाचा कृपाशिर्वाद आहे. शोधने आव्हानात्मक आहे,या धंद्या मुळे शालेय विद्यार्थी ही याच्या आहारी जाण्याची शक्यता असल्याने हे धंदे त्वरीत बंद करण्याची  मागणी नरेश देसले यांनी केली आहे.  मात्र पोलिसाना हे धंदे बंद करणे शक्य नसल्यास  मला ही परवानगी मिळावी असे पत्र सादर करताच मुरबाडचे  पोलिस उपविभागिय आधिकारी राजेद्र मोरे  यांनी याची गंभिर दखल घेत, मुरबाड चे पोलिस निरिक्षक अजय वसावेयांना कारवाई करुन चौकशीचा अहवाल त्वरित पाठविण्याचे आदेश दिले. मात्र पोलिस अशा धंदा करणाऱ्याची गय करत नसल्याचे व कुठ लीही परवानगी देत नसल्याचे उपविभागिय आधिकारी राजेद्र मोरे यांनी सांगितले.  मात्र या अवैध धंद्यामागच्या सुत्रधाराला पकडण्याचे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *