मुरबाड मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत जेवण 

346
           मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्यातील  कोरोनाचा उपचार घेणारे बाधित व त्याचे नातलग यांची जेवणाची मोठी गैरसोय होत असताना अशा नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मुरबाड मध्ये, हाक तुमची साथ आमची अशी हाक देत तालुक्यातील युवा भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा चे मुरबाड तालुका अध्यक्ष अण्णा साळवे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे पासून मोफत दोनवेळा जेवणाची सोय केली आहे.
      ज्या गरजवंताना सकाळी व संध्याकाळी जेवणाचा डबा हवा असेल अश्यानी  9272606090 व 8888416090 या  क्रमांका वर संपर्क करून मागणी करावी. मागणी नुसार विनामूल्य जेवणाचा डबा पोहच केला जाईल अशी माहिती अण्णा साळवे यांनी दिली. यावेळी या सेवाभावी उपक्रमात अनेकांनी सहभाग दर्शवला असल्याचे ही सांगितले.  1 मे रोजी मुरबाड सरकारी कोव्हीड सेंटर मध्ये डॉक्टरांच्या उपस्थितीत या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.  या उपक्रमाचे स्वागत जरी होत असले तरी या यामूळे सरकारी कोव्हीड सेंटर मधील जेवणाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *