प्रतीक हिंदुराव यांनी वाढदिवसानिमित्ताने सोडविला मतिमंद शाळेचा विजेचा प्रश्न

945
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व प्रतीक हिंदुराव यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील शिरवली येथील तारांगण मतिमंद मुलांची शाळेचा विजेचा प्रश्न मार्गी लावला आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा असून या शाळेतील अंधाराला प्रकाशमान करून आपला वाढदिवस साजरा केला. या शाळेला इन्वर्टर, बॅटरी व विद्यार्थ्यांना खाऊ भेट यावेळी देण्यात आला. प्रमोद हिंदुराव यांच्या माध्यमातून लवकरच एक ॲम्बुलन्स सेवा सुरु करण्यात येणार असून, प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी खास करून युवा वर्गाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, लवकरच आपण सर्व जण मिळून या गंभीर परिस्थितीतून बाहेर निघू असे प्रतिक हिंदुराव यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रतीक हिंदुराव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद हिंदुराव यांचे पुत्र असून, वडीलाप्रमाणे त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केले आहे. या वाढदिवसप्रसंगी मुरबाड शहराध्यक्ष दिपक वाघचौडे यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *