डांबरीकरण रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर ; उपसरपंचासह गावातील लोकांचा आरोप

434
देवरी, गोंदिया (-प्रतिनिधी, शैलेश राजनकर) : शिरपुर ग्रामपंचायत हद्दीतील कुभांरटोला गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ०६ ते कुभांरटोला सुमारे दिड किलोमीटर असलेल्या डांबरीकरण रसत्याचे भुमीपुजन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरटे यांच्या हस्ते सरपंच नितेश भेंडारकर शिरपूर ग्रापंचायत, सरपंच लखनलाल पंधरे भर्रेगाव व शिरपुर-कुभांरटोला गावातील लोकांच्या उपस्थीत दि. १८ मार्च २०२१ रोजी पार पाडण्यात आले व  दि. १० मे २०२१ रोजी डांबरीकरणाच्या रस्त्याला कामाला संबधीत ठेकेदाराकडुन सुरु करण्यात आले. परंतु  दुसऱ्याच दिवसी संबधीत ठेकेदार डाबंरीकरणाच्या रस्त्याला निक्रुष्ट साहीत्याचा वापर करत असल्याचे गावातील लोकांच्या निदर्शनात आल्याने कुभांरटोला गावातील लोकानीं काम बंद करण्याची मागणी केली आहे.
देवरी तालुक्यातील शिरपुर ते कुभांरटोला गावातीर दिड किलोमीटर डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम पाच दिवसा पासुन सुरु आहे. मात्र, करण्यात येत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी भर्रेगावचे उपसरपंच, कुभांरटोला गावातील धनेश नंदलाल बारसे, रोहित शिवनकर, शिताराम सलामे, रामु संपीं, सनत भालचंद गुड्डी, देवेश्री राजु निनावे व कुभांरटोला गावातील नागरीकानीं  केली आहे. काम सुुरु असताना संबधित अभियंता या होत सुुरु असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या बांधकामाकडे आलेच नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे. सदर बांधकाम सुरु असताना निक्रुष्ट साहीत्याचा वापर डांबरीकरण रस्त्याच्या बांधकामात सुरु असून, बांधकाम त्वरीत थांबवून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी कुभांरटोला गावातील लोकांनी केली आहे.
आमच्या गावामध्ये डाबंरी रस्त्याचे काम सुरु असुन, हे काम कुंभारटोला ते शिरपुर पर्यंत आहे. हे काम उमा कंन्ट्रक्शन ह्या कंपनीला मिळाला असुन येथील सर्व गावकरी लोकांचे या होत असलेल्या निक्रुष्ट रस्ता बांधकामाबद्दल विरोध आहे. त्यात हे डांबरीकरनाचे काम किती रुपयाचे आहे ते निर्देशीत बोर्डवर लिहलेेले नाही. हे होत असलेले काम निक्रुष्ट दर्जाचे होत आहे, निक्रुष्ट दर्जाची गीट्टी वापरली जात आहे. त्यामुळे हे  काम बंद करायला सांगीतले तरी काम बंद केले नसल्याने या कामाचा व ठेकेदाराचा गावपातळीवर सगळ्यांनी विरोध केला आहे.
  – धनेश बारसे, ग्रामस्थ, कुभांरटोला
शिरपुर ते कुभांरटोला डाबंरीकरण रस्ता बांधकामा संदर्भात कालच माझा संबधीत ठेकेदाराशी बोलना झालेला आहे. मी बाहेर असल्यामुळे सदर जागेवर गेलो नाही पंरतु ऊद्या त्या जागेवर जाऊन कामाची चौकसी करुन ते काम दिलेल्या ईस्टीमेट नुसार होत नसेल व लोकांना त्रास दायक असेल तर काम बंद करुन चौकसी करण्यात येईल.
         -लांजेवार, J.E.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *