टाकळी हाजी प्राथमिक केंद्रास विविध साहित्य भेट – “आमची शाळा”  सोशल मीडिया गृपचा उपक्रम 

967
टाकळी हाजी प्राथमिक केंद्रास विविध साहित्य भेट – “आमची शाळा”  सोशल मीडिया गृपचा उपक्रम 
                शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – दहावी-बारावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावरील “आमची शाळा” या ग्रुपच्या वतीने टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी डॉपलर फेटल मॉनिटर, व्हिलचेअर स्ट्रेचर व ओम्रोन बीपी मशीन असे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
ज्या गावात,शाळेत आपण शिक्षण घेतले, खेळलो, बागडलो, लहानाचे मोठे झालो त्या आपल्या गाव व परिसरातील जनता आज कोरोना महामारीच्या संकटाने भयभीत झाली आहे. सर्वांचे जनजीवनच  विस्कळित झाले आहे.एकमेकांची मने सैरभैर झाली आहेत.आता  आपल्या या समाजबांधवांना मायेचा आधार देण्याची खरी गरज आहे.   सगळ्यांना या साहित्याचा फायदा मिळावा या भावतेूनच ही मदत केली असल्याचे विजय थोरात यांनी सा. समाजशीलशी बोलताना सांगितले.
टाकळी हाजीच्या “आमची शाळा” या सोशल मीडिया गृप मध्ये विविध जिल्ह्यांत कार्यरत असणारे अधिकारी,व्यवसायिक आहेत.हाच खरा ग्रामस्थांचा अभिमान आहे की,आमच्या गावची मुले शिक्षण घेऊन मोठी झाली.संकटकाळी मात्र आम्हाला ते विसरली नाहीत व विसरणार सुद्धा नाहीत.
यामध्ये वनअधिकारी संतोष चव्हाण,अरुण सोदक,डॉ.सोनाली शिंदे, ग्रामसेवक भूपेंद्र कांदळकर, संदिप गावडे, विजय थोरात,दत्तात्रय गावडे,विजय पंडीत,दत्तात्रय कांदळकर,राहुल चोरे,मयूर कांदळकर,प्रशांत शितोळे,अनिल बिबवे,भिमाजी घोडे,गणेश टाव्हरे,लहू निचीत,रामदास शितोळे,देविदास बारहाते,शरद गावडे,रघुनाथ कांदळकर,सुवर्णा पानगे,अर्चना शेगर,सारिका सोदक,छाया सोदक यांचे खूपच सहकार्य लाभले.
या ग्रुपने प्राथमिक आरोग्य केंद्राला केलेली मदत इतरांनाही सेवाभावी काम करण्यास प्रेरणादाई ठरणार आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले गावकरी सक्षम होतील,हा उदात्त विचार घेऊन या माजी विद्यार्थ्यानी हे सर्व साहित्य  आरोग्य केंद्रास भेट दिले आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण,पर्यवेक्षक डॉ.भरत सोदक,डॉ.विनायक गोसावी,कांदळकर मॅडम उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *