कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर अपघात ; मोटरसायकलस्वार जागीच ठार

634

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : कल्याण मुरबाड माळशेज महामार्ग 61 वर आज मोटारसायकल व आयशर ट्रक चा अपघात होऊन या अपघातात मोटर सायकलस्वार जागीच ठार झाला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले मुरबाड मधील हेमंत कृष्णकांत वेदपाठक हे आपली मोटरसायकल क्र. एम.एच.14 डी इ 2469 वरून जात असताना आयशर ट्रक क्र. एम.एच. 14 जीयु  3323 यांची टक्कर होऊन मोटर सायकलस्वार हेमंत वेदपाठक हे जागीच मरण पावले. या बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मुरबाड तालुक्यातील अनेक अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी कल्याण मुरबाड बस सेवा तसेच प्रवासाची गैर सोय असल्याने आपल्या मोटरसायकल ने कामावर जातात. मात्र कधीकधी किरकोळ अपघात किंवा भीषण अपघातात आपले जीव ही गमवावे लागत असल्याने  प्रवासाची सोय व्हावी अशी मागणी होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *