काँग्रेसचे पेट्रोल-डिसेल, गॅस व खाद्यतेल यांच्या भरमसाठ दरवाढी विरूध्द दुचाकींना “दे धक्का “ आंदोलन !

422

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीने आज पेट्रोल-डिझेंल, गॅस व खाद्यतेल यांच्या भरमसाठ दरवाढीविरूध्द दुचाकींना “दे धक्का“ आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.  या दे धक्का अदोलनात तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, सेवादलचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे, ओ.बी.सी. जिल्हाध्यक्ष दिनेश सासे, युवकचे  जिल्हासरचिटणीस गणेश देशमुख, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संध्या कदम, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष भरत मुरबाडे, राहुलजी गांधी विचारमंचचे तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, पर्यावरणचे तालुकाध्यक्ष मदन तरे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तर या आंदोलनात अनेक मुद्दे उपस्थित केले. पेट्रोल-डिजेलला लागणारे क्रुड तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असुनही राज्यासह  मुरबाडमध्ये पेट्रोल शंभरी पार केली. तर डिजेल ९२.३७ रु.यांना मिळते त्यामुळे दुचाकींना “दे धक्का“ आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला व जर महागाई कमी केली नाही तर सामान्य जनता ही केंद्रातील भाजपा सरकारला आगामी २०२४ ला  धक्का देत पायउतार करेल. खाद्यतेल २२० रु. किलो व घरगुती गॅस सिलेंडर ९०० रु. पर्यंत मिळत असल्याने  महिलांचे महिन्याचे बजेट हुकत आहे. नोटबंदी व जीएसटीमुळे कोट्यावधी रोजगार गेले असुन नोकरी असणाऱ्याचे पगार मागील दोन वर्षापासुन वाढला नाही त्यातच पेट्रोल ची भाव गगनाला  भिडलेला आहे. त्यामुळे तरुण-तरुणींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *