मुरबाड,ठाणे : चारित्र्याच्या संशयावरुन विवाहीतेची हत्या झाल्याचा संशय, दोषीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी विवाहितेच्या वडिलांची ठाणे पोलीस अधीक्षकांकडे मागणी

526
           मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरातील आवळेवाडी येथिल  कमल अशोक निरगुडा या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी चारित्र्याच्या संशयावरुन हत्या करुन तिचा मृतदेह घरातच ठेवला असताना दोषीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी  किन्हवली पोलिसात मृताच्या वडिलानी  केली आहे.२४ ऑक्टेबर २०१८ ही रोजी घटना घडली असून या घटनेचा गुन्हा दाखल करण्या ऐवजी यातील संशयितांना अभय दिल्याने मयत कमल हिचे वडिलानी पोलीस अधिक्षक ठाणे याना गुन्हा दाखल करण्यासाठी साकडे घातले आहे.
          याबाबत सविस्तर वृत्त असे की,टोकावडे परिसरातील रमेश कमळु खाकर यांची मुलगी कमल हिचा विवाह शहापूर तालुक्यातील नामपाडा येथील अशोक जयराम निरगुडा याच्याशी  विवाह मार्च 2017 मध्ये झालेला होता.अशोकची पहिली पत्नी प्रसुती दरम्यान मयत झाल्याचे त्याच्या नातलगानी सांगितले असल्याने कमल हिचा विवाह अशोक बरोबर झाला.  मात्र अशोक हा पहिल्या पत्नीलाही अश्याच प्रकारे मारहाण करत असल्याचे आता समोर आले आहे. मात्र विवाह नंतर काही दिवस त्यांचा संसार सुखाने चालला.
.        दरम्यानच्या काळात अशोक याचे शेजारील मुली सोबत सुत जुळले आणि तो कमल हिस दररोज मारहाण करु लागला .परंतु हि मारहाण कमल हिने सहन करत याची कोणत्याही प्रकारे सासरी वाच्यता केली नाही.मात्र तीच्या  गावातील तिची जीवलग मैत्रीण असलेल्या मुलीला तिने आपली व्यथा सांगितली होती.कि माझा नवरा माझ्यावर संशय घेऊन मला दररोज मारहाण करित आहे.मी आता सासरी गेल्यावर परत माहेरी येणार नाही.
              असे असताना अशोक याचे ज्या मुली सोबत सुत जुळले होते .त्या मुलीने दि.20 आक्टोबर रोजी अंगावर राँकेल घेऊन मृतपावली. तीने आत्महत्या केली.कि तीची हत्या झाली हे गुलदस्त्यात असताना या घटनेची कमल हिच्या कडून वाच्यता झाल्यास अशोक.त्याचे वडील व आई हिचे बिंग फुटेल म्हणुन त्यांनी तो पुरावा नष्ट करण्यासाठी कमल हिचा काटा काढण्यासाठी तिला ठार केले व नंतर दोन दिवसांनी तिने विष प्राशन केले आहे. तिला पुढील उपचारासाठी शहापुर येथे उपचारासाठी नेले असल्याचा फोन कमल हिचे वडिलांना अशोक याचा मामा महेंंद्र कान्हु खोडका यांनी फोन करुन आम्हाला कळविले असता आम्ही शहापूर येथे गेलो असता कमल हिचे.शरिराला दुर्गंधी येत होती.त्यामुळे आम्ही कमल हिचा सासरच्या मंडळींनी खुन केला असल्याची तक्रार पोलीसाकडे देत असताना त्यांनी आमची तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली. तिचे शवविच्छेदन हे मुंबई येथे करण्यात यावे अशी मागणी केली असता .कमल  हिचा विषारी औषध घेऊन  मृत्यु झाला असल्याची फिर्याद दाखल करुन दोषींना पाठिशी घातले.  माझ्या मुलीने आत्महत्या केली नसुन तीची हत्या झाल्या चा आरोप मृताच्या वडिलानी केला आहे. गुन्हेगाराना पाठीशी घालणाऱ्याना या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी पोलीस अधीक्षक ठाणे यांना केली आहे.
– प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *