पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न उपस्थित करा : प्रमोद कांदळकर पाटील – मंत्री वळसे पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी

905

पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न उपस्थित करा : प्रमोद कांदळकर पाटील – मंत्री वळसे पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी

    शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) -महाराष्ट्र सरकारच्या आगामी पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न सभागृहात उपस्थित करावा अशी मागणी राज्याचे गृह मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य परिषदेचे समन्वयक प्रमोद कांदळकर पाटील यांनी निवेदन देत केली आहे.याबाबत नामदार वळसे पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले असल्याची माहिती प्रमोद कांदळकर पाटील यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
मंत्री वळसे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,धनगर समाज गेली ७० वर्षे आपली मागणी सरकार दरबारी सातत्याने मांडत आहे. पण सरकार या मागण्याबाबत जाणीवपूर्वक पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.  सरकारने जरी धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेले असले तरी शिरूर-आंबेगावचे आमदार,आमचे लोकप्रतिनिधी म्हणून धनगर समाजाच्या मागण्या आपण आगामी पावसाळी अधिवेशनात मांडाव्यात अशी मागणी निवेदनातून मंत्री वळसे पाटील यांना करण्यात आली आहे.
धनगर समाजाला एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न आपण सभागृहात उपस्थित करावा,जे आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला त्या सराव योजना व मागील १ हजार कोटी व चालू आर्थिक वर्षाचे एक हजार कोटी असे २ हजार कोटी रुपये धनगर समाजासाठी त्वरित उपलब्ध करुन घ्यावेत.आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर यांचे भव्य स्मारक शिरूर तालुक्यामध्ये उभे करण्यात यावे इत्यादी मागण्या धनगर समाजाच्या वतीने मंत्री वळसे पाटील यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्याचे प्रमोद कांदळकर पाटील यांनी सांगितले.यावेळी कवठे येमाईचे बबनराव घोडे,माजी सरपंच अरुण मुंजाळ,वसंत पोकळे,संदीप चाटे इत्यादी धनगर समाज बांधव उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *