महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध ; गोंदिया येथे राष्ट्रवादीचा एल्गार

499

माजी आमदार राजेंद्र जैन तथा जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध मोर्चा आंदोलन

देवरी, गोंदिया (-प्रतिनिधी, शैलेश राजनकर) : पेट्रोल डीझेल दरवाडी चा निषेध… निषेध… , गॅसचा दरवाडी चा निषेध…, केंद्र सरकारच करायच काय खाली डोक वर पाय, अशा अनेक घोषणांनी आज (दि ५ जुलै) गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने दणाणून सोडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते. वाढलेले गॅस , पॅट्रोल, डीझेल व खाद्य तेलाचे दर यामुळे वाढत चाललेली महागाई याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी गोंदिया जिल्हा यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतीमा समोरील परिसरात, गोंदिया येथे महागाईच्या विरोधात आंदोलन छेडले होते. डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करून मोर्चाची सुरुवात केली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार राजेंद्र जैन तथा जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी आंदोलनाची सुरवात सायकल मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करीत जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन देण्यात आले.
                यावेळी बोलताना श्री जैन म्हणाले कि, ” केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज सातत्याने महागाई वाढत आहे. कालच घरगुती गॅसच्या किमती २५ रुपयांनी वाढल्या आहेत. तर पॅट्रोलचे दर तब्बल १०६ रुपयांवर पोहचले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून हातातला रोजगार हिरावुन घेतला. अशा अनेक बाबींनी सामान्य माणूस, मजूर, कष्टकरी, छोटे मोठे व्यापारी यांची अक्षरशः वाताहात झाली आहे. यामुळे या सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. “
 या सोबतच पक्षातील वरिष्ठ मान्यवर विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, सुनील भालेराव, सुशीला भालेराव, प्रभाकर दोनोडे, के.बी. चौहान, अशाताई पाटील, कुंदा दोनोडे व सुनील पटले यांनी केंद्र सरकारने सातत्याने वाढवलेल्या महागाईचे विरोधात मार्गदर्शन केले. गोंदिया जिल्ह्यातील तालुका निहाय झालेल्या या आंदोलनात घोषणा व निदर्शन करीत तर विविध ठिकाणी गॅस सिलेंडर रस्त्यावर आणून सर्व ठीकाणी हि आंदोलने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवी मुंदडा यांनी केले तर गणेश बरडे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी महिला पदाधिकारी आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *