मुरबाड प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

312
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्ष शरद पाटील यांना भ्रमणध्वनी वरून अर्वाच्य शिवीगाळ देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्या बद्दल ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व भाजप अंबरनाथ अध्यक्ष राजेश पाटील यांच्या विरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद पाटील यांना भ्रमणध्वनी वरून आलेल्या धमकीमुळे त्यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी अर्ज दाखल केला असता या अर्जानुसार मुरबाड पोलीस ठाण्यात राजेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आमदार किसन कथोरे यांच्या सांगण्यानुसार राजेश पाटील यांनी धमकी दिल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या पत्रात म्हटले आहे. शरद पाटील हे पूर्वी भाजपचे आक्रमक कार्यकर्ते तर काही काळ राजेश पाटील यांचे स्वीय सहायक होते. मात्र त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या कार्याशी प्रेरित होऊन भाजपला रामराम ठोकत प्रहार जनशक्ती पक्षात सहभागी झाले व तालुक्याध्यक्ष पदी विराजमान झाले सध्या प्रहार जनशक्ती पक्ष मुरबाडमध्ये सक्रिय कार्य करत आहे. तर भाजपचा त्याग केल्यावर शरद पाटील हे आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात प्रचार करतो यामुळे आमदार किसन कथोरे यांच्या सांगण्यावरून मला राजेश पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने राजेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शरद पाटील यांनी केली आहे. तर या संदर्भात मुरबाड पोलीस अधिक तपास करत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *