रक्षाबंधनसाठी बहिणींची भावासाठी राखी खरेदीची लगबग – कवठे येमाईत विविध आकर्षक राख्यांची दुकाने सजली 

542
           शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून सर्वसामान्यांचे जीवन,सण,उत्सव,कार्यक्रम यांना प्रशासनाकडून घातलेल्या नियमावली व सूचनांमुळे सर्वच सण,उत्सव कार्यक्रम रद्दच करण्यात आले. परंतु आता शासनाने ग्रामीण भागासाठी ही दिलेली सवलत कोरोनाचे नियम पाळत व्यापार,मालाची खरेदी विक्री हळूहळू सुरु झाली असली तरी,ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले आठवडे बाजार अद्याप ही बंदच आहेत.रक्षाबंधनासाठी कवठे येमाईत विविध प्रकारच्या राख्यांची दुकाने सजली असून भावांसाठी राखी खरेदी करण्यासाठी बहिणींची लगबग सुरु असल्याचे आज दि. २१ येथे दिसून आले. विशेष म्हणजे राखी खरेदीसाठी आलेल्या प्रत्येक मुली,महिलांनी कोरोनाचे नियम पाळत,सुरक्षितता म्हणून मास्क परिधान केलेले दिसत होते. नेहमी प्रमाणे राखी खरेदीसाठी अद्याप हवे तेवढे ग्राहक नसून १ रुपया ते १०० रुपये दराच्या राख्या विक्रीसाठी ठेवल्याचे राखी विक्रेते बंटी शिंदे यांनी सांगितले. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी खरेदीस ग्राहक वाढतील असा विश्वास शिंदे यांनी सा. समाजशीलशी बोलताना व्यक्त केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *