संत शिरोमणी सावता महाराजांचे 16 वे वंशज रमेश वसेकर महाराज यांची शिरूर येथे भेट

511

शिरूर, पुणे (समाजशील वृत्तसेवा) : संत शिरोमणी सावता महाराज यांचे 16 वे वंशज ह.भ.प. श्री.रमेश वसेकर महाराज यांनी शिरूर मधील विठ्ठलनगर येथील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिराची आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी होत असणाऱ्या मंदिराची पाहणी केली. यावेळी वसेकर महाराज यांचा सावता माळी प्रतिष्ठानच्या वतीने महाराजांचा शार श्रीफळ  देऊन  सत्कार करण्यात आला. यावेळी शिरूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक निलेश लटांबळे, किरण बनकर, रामभाऊ होले, वसुंधरा V मार्ट चे व्यवस्थापक मिठठुशेठ गदादे, राजेंद्र जाधव, राजेंद्र खेतमाळीस, दीपक ननवरे, शरद रासकर, दादाभाऊ भुजबळ, खराडे साहेब आणि दादाभाऊ भुजबळ यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी मिठठुशेठ गदादे यांनी प्रास्ताविक केले. तर किरणशेठ बनकर यांनी सर्वांचे आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *