शिक्रापुर पोलीस स्टेशन अंतर्गत “तक्रार निवारण दिन” ; काही तक्रारीवर तात्काळ दखल घेवुन जागेवरच निरसन

296
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : डॉ. श्री अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीणयांच्या अभिनव कल्पनेतुन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग मिलिंद मोहिते, दौंडचे SDPO राहुल धस यांच्या सुचनेप्रमाणे शिक्रापुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचे वतीने गजानन मंगल कार्यालय, शिक्रापुर येथे सकाळी 10:00 वा. ते  14:00 वा. दरम्यान *”तक्रार निवारण दिन” चे आयोजित करण्यात आले होते.यावेळी शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे हे त्यांचे अधिकारी व सर्व बिट अंमलदार यासोबतच कामकाजासाठी आवश्यक असणारे लंँपटांँप-प्रिंटर व  ईतर इलेक्ट्रॉनिक साहित्यासह उपस्थित होेते. सर्व अधिकारी/ बिट अंमलदार यांनी नव्याने  येणार्‍या व यापुर्वी प्राप्त असलेल्या  प्रत्येक अर्जदाराकडे त्यांचे तक्रारी अनुषंगाने समक्ष भेट घेवुन चौकशी करण्यात आली. कांही अर्जदारांचे तक्रारीवर तात्काळ दखल घेवुन जागेवरच निरसन केले गेले. तर कांही अर्जदार यांना त्यांची तक्रार नेमके कोणत्या खात्याशी/विभागाशी संबंधित आहे याबाबत माहिती नसल्याने त्यांना सदर बाबतची माहिती देवुन त्यांचे अर्जाबाबत जागेवरच निरसन करुन पुढील कार्यवाही करिता योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. सामन्य नागरिकांना ज्या गोष्टीची उत्सुकता असते त्या बाबत विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे शिक्रापुर पोलिसांनी गुन्ह्याचे तपासा दरम्यान प्राप्त केलेला मुद्देमाक व न्मा. न्यायालयाचे आदेशाने प्राप्त झालेले मुद्देमाल असे सुमारे  १० लाख रुपयांची किंमत असलेला मुद्देमाल या दिनाचे औचित्य साधुन फिरयादी यांना परत देण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने रोख रक्कम, वाहने, मोबाईल हंँण्डसेट वगेैरेचा समावेंश आहे. तसेच आलेल्या प्रत्येक अर्जदार यांचेकडे महिला पोलीस उज्ज्वला गायकवाड यांनी सगळ्यांकडे आवर्जुन चौकशी/विचारपुस करुन सगळ्यांची रजिस्टरमध्ये नोंद घेतली असुन दरम्यान पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
  • एकुण उपस्थित अर्जदार=80
  • तडजोड= 20
  • दिवाणी बाब= 27
  • प्रतिबंधात्मक कारवाई= 05
  • ईतर कार्यालयाशी संबंधित = 21
  • तसेच संपुर्ण दिवसभरामध्ये 125 अर्जांवर कार्यवाही करुन पुढील कार्यवाही केलेली आहे.

तक्रार निवारण दिन निमित्त आलेल्या सर्व तक्रारदार व अर्जदार यांचेसाठी चहा-पान ची व्यवस्था करण्यात आलेली होती. तसेच अनेक अर्जदार यांनी त्यांचे तक्रारी अर्जावर बोलावुन घेवुन तात्काळ कार्यवाही केल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *