गणेशोत्सव काळातील घरफोडी करणारे चोरटे अजूनही मोकाट ; मुरबाड पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान

374
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड शहरातील गणेशनगर परिसरात गणेशोत्सव काळात घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी लाखो किंमतीचा ऐवज लंपास केला. तर याच वेळी आणखी तीन ठिकाणी ही असाच प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र त्यांच्या हाती काही लागले नसले तरी एकाच रात्रीत तीन घरफोड्या झाल्याने चोरटयांनी शहरात दहशत निर्माण केल्याचे दिसून येत आहे. मात्र यामुळे मुरबाड पोलिसांनी समोर चोरट्यांनी आव्हान तयार केले आहे. याबाबत मुरबाड पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी माहिती देताना सांगितले की, “आमचा तपास सुरू असून लवकरच यश मिळेल.” मात्र गणेशोत्सव काळात बंद घराचा फायदा चोरटयांनी केलेल्या घरफोडीमुळे मुरबाड मध्ये पुन्हा चोरी सत्र सुरू होते की काय ? असा प्रश्न नागरिक करत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *