बेकायदेशीरपणे ग्रामसभा तहकूब करणाऱ्या प्रशासक व ग्रामसेवकावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

275
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : कोरोना काळात ग्रामसभा घेण्यास बंदी असताना शासनाने ग्रामपंचायतींना आता ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली असताना कोरोना काळानंतर पहिल्यांदाच खेडले तळवली ग्रामपंचायत मध्ये 21/10/2021 रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या ग्रामसभेचा अजेंडा ठराविक नागरिकांना देत उपस्थिती कमी असल्याने प्रशासक व ग्रामसेवक यांनी सदर ग्रामसभा तहकूब केल्यामुळे या दोघांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या ग्रामसभेत मागील सभेचा इतिरुत वाचन, शासन निर्णय व परिपत्रक वाचन, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, सन 2021/22 साठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेचा पुरवणी,आराखडा, 2022/23साठी रोजगार हमी योजनेच्या समृध्दी लेबर बजेट तयार करणे, 15व्या वित्त आयोगातून करण्यात येणाऱ्या कामांना प्रशासकीय मंजुरी अश्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार असताना. सभेचा अजेंडा सर्वांना न देता कमी उपस्थितीमिळे सभा तहकूब केली. मात्र ग्रामसभा तहकूब केली नसल्याचा शेरा न मारल्याने या प्रोसेडीग चा गैरवापर होऊ शकतो अशी शंका घेत खेडले तलावळी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना पत्र देत ग्रामसेवक व प्रशाकीय अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. तर ग्रामस्थ व रिपब्लिक फेडरेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे, मुकेश शिंदे, रविंद्र दळवी, दिनेश गायकर, सतोष खापरे, पद्माकर दळवी यांनी गटविकास अधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी मागणीचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *