शिक्रापूर,पुणे : विद्यार्थ्यानी स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी – रामदास शिंदे, जागतिक एडस दिनानिमित्त शिक्रापूर विद्याधाम प्रशालेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

953
           शिक्रापूर,पुणे : विद्याधाम प्रशालेमध्ये आज जागतिक एडसदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य नरेंद्र व्यवहारे होते.
           यावेळी  रामदास शिंदे यांनी एड्स या आजाराविषयी माहिती दिली.त्याचप्रमाणे तो आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना यांचे कार्य व एड्स बाबतचे धोरण यांची देखील विस्तृत माहिती दिली. त्याचबरोबर आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी समतोल आहाराचे महत्व विशद केले. कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक बाबुराव कोकाटे, प्रा. दिगंबर नाईक, प्रा.सुभाष कुरंदळे, सुनील क्षीरसागर,राजश्री ढमढेरे, संगीता दुधाडे इत्यादी अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कुंभार यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार संतोष परदेशी यांनी मानले.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *