जी ए सॉफ्टवेअरचा संचालक सौरभ त्रिपाठी याला सायबर पोलिसांनी अटक

231
पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : शिक्षक पात्रता परीक्षेत टीईटीच्या 2018 परीक्षेतही घोटाळा झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या संदर्भातच सायबर पोलिसांकडून जी ए सॉफ्टवेअरचा संचालक सौरभ त्रिपाठी याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ त्रिपाठी हा सध्या विनर कंपनीत कार्यरत असून ही कंपनी जरी 2012 मध्ये सुरू झाली असली तरी 2018 पासून त्रिपाठी हा या कंपनीत डायरेक्टर आणि 50 टक्के मालक होता. त्रिपाठी हा दुबईला पळून जात असतानाच सायबर पोलिसांनी त्रिपाठी याला लखनौमधून अटक करण्यात आली आहे. त्रिपाठी याला 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनचे डीसीपी भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.
सौरभ त्रिपाठी हा सध्या विनर कंपनीत काम 
सौरभ त्रिपाठी हा सध्या विनर कंपनीत कार्यरत आहे. तो या कंपनीत डायरेक्टर आणि 50 टक्के मालक आहे.शिक्षण विभागाच्या परीक्षांचे कामकाज हे सध्या विनर कंपनीकडे आहे. या कंपनीकडून उत्तर प्रदेशात घेण्यात आलेल्या परीक्षा देखील वादग्रस्त ठरल्या होत्या. या विनर कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षांची माहिती घेण्यात आली असून त्याची देखील चौकशी होणार आहे.

त्रिपाठी दुबईला जात होता पळून
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्रिपाठी हा व्हिसा घेऊन दुबईला जात होता. तेव्हा पोलिसांनी याचा सखोल तपास केला असता तो सुरवातीला दिल्ली इथे असल्याचं समजलं आणि परत त्याचं लोकेशन हा आग्रा, लखनौ इथं भेटलं आणि परत त्याचा मागोवा घेतला असता त्याने त्याच मोबाईल बंद केलं आणि मग त्रिपाठी याला लखनौ इथून अटक करण्यात आली. अशी माहिती देखील यावेळी सायबर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल वाघमारे याने दिली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *