रामलिंग महीला उन्नती बहु.सामाजिक संस्था व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

240
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : रामलिंग महीला उन्नती बहु.सामाजिक संस्था व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचे सन्मान करण्यात आला. “सावित्रीबाई यांच्या महान कार्यामुळेच आज महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांच्यामुळेच मुलींना शिक्षण घेता येत आहेत. भेदभाव न करता शिक्षण क्षेत्रात समानतेने मुलींना शिक्षण घेऊन दिले पाहिजे. एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंबाचा उद्धार होतो.त्यांच्या या कार्याचा वारसा पुढे निरंतर चालू राहावा यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. तसेच दरवर्षी प्रमाणे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लखनीय कार्य करणाऱ्यांना संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुरस्कार दिला जातो असे मनोगत रामलिंग महीला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी यावेळी व्यक्त केले.
यावर्षी हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उल्लखनीय कार्य केल्याबद्दल संपदा दिनेश राठोड यांना देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप श्रीफळ, शाल, पारितोषिक असे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामलिंगचे सरपंच नामदेव जाधव होते तर प्रमुख पाहुणे शिरूर नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती  मुज्जेफर कुरुशी, वकील रवींद्र खांडरे, सामाजिक कार्यकरते शिवाजी दसगुडे, रमेश दसगुडे उपस्थित  होते. यावेळी वाळके मॅडम यांनी सावित्रीबाई यांचे विचार व्यक्त केले तसेच पाहुण्यांनी त्यांची मनोगते व्यक्त केली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्षा शशिकला काळे, नगरसेविका मनीषा कालेवार, महीला दक्षता समिती सदस्या सुवर्णा सोनवणे, जया खांडरे, राणी शिंदे, ललिता पोळ, छाया हारदे, सारिका विरसेव, अखिल भारतीय मराठा महासंघ सदस्या प्रिया बिरासदार, शकीला शेख, स्नेहा काळे, संध्या गायकवाड, धामणे ताई, गलांडेताई इतर महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राणी कर्डिले यांनी केले तर सर्वांचे आभार अँडव्होकेट सरिता खेडकर यांनी मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *