जि.प. शाळा गणेशनगरच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी किरण कांदळकर तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब कांदळकर  यांची निवड

384
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई केंद्रा अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगरच्या शालेय व्यवस्थापन समितीची आज गुरुवार दि. ०३ निवड करण्यात आली.अध्यक्षपदी किरण कांदळकर पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब कांदळकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्ता घोडे यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
          कवठे येमाई गावापासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेली गणेशनगरची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या वर्गात परिसरातील सुमारे ७० च्या आसपास विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. शालेय परिसर निसर्गरम्य असून शाळेच्या सर्वागींण प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन आगामी काळात कार्य करणार असल्याचे निवडीनंतर अध्यक्ष किरण कांदळकर पाटील व उपाध्यक्ष भाऊसाहेब कांदळकर पाटील यांनी सांगितले.ही निवड प्रक्रिया अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे गणेशनगर जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संदीप घोडे यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.
           यावेळी कवठे येमाई ग्रामपंचायतीचे सदस्य रामदास इचके,सामाजिक कार्यकर्ते दत्ता घोडे,बाळासाहेब घोडे,संदीप भाऊ घोडे,पांडुरंग घोडे,संतोष शितोळे,अंकुश शितोळे,राजेंद्र मुसळे, दीपक जाधव, अर्जुन कांदळकर,सोमनाथ कांदळकर,जयवंतराव इचके,  तुषार भोर,गणेश घोडे, शाळेतील शिक्षक वृन्द खंडागळे, शिवले, चौधरी मॅडम,शिंदे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *