मनसेच्या आंदोलनाला यश! महिबूब सय्यद यांचे बेमुदत उपोषण मागे

419
शिरूर, पुणे (समाजशील वृत्तसेवा) : अतिक्रमण करून बेकायदा उभारलेल्या भिंतीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद हे शिरूर नगर परिषदेच्या समोर बेमुदत उपोषणाला बसले होते. यावेळी उपोषणकर्ते मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे सन 2021 मध्ये विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पुणे यांनी शिरूर नगरपरिषदेच्या स्वमालकीच्या जागेवर परवानगी न घेता नैसर्गिक ओढा (नाला) यामध्ये भिंत उभारलेली आहे. वास्तविक पाहता भिंतीच्या कामाच्या सुरुवातीलाच मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून व निवेदन देऊन अनाधिकृत भिंतीबाबत अवगत करण्यात आले होते. यावेळी जनता दल (सेक्युलर) पुणे जिल्हा अध्यक्ष संजय बारवकर, प्रदीप कर्डे, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष फिरोज सय्यद, इनूस सय्यद,भाजपा उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष संजय पाचंगे, विजय नरके, आम आदमी पार्टी शहराध्यक्ष अनिल डांगे, शिव शंभु जिजाऊ सेना तालुका अध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे, सामाजिक कार्यकर्ते अजय कोठारी,यांनी या आंदोलनाला  पाठिंबा दिला होता. यावेळी शिरूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरवाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी यांनी उपोषणकर्ते महिबूब सय्यद यांना पत्र दिले की विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, पुणे यांना जागेच्या मालकी हक्काबाबत जिल्हाधिकारी यांचा अंतिम निर्णय होईपर्यंत सुरक्षा भिंतीचे काम थांबविण्याचा सूचनावजा आदेश देण्यात आला आहे. हे पत्र घेऊन महिबूब सय्यद यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्या हातून महिबूब सय्यद यांनी लिंबू शरबत पिऊन उपोषण सोडले. यावेळी नगर रचना विभागाचे निखिल कांचन, पोलीस राजेंद्र गोपाळे, चव्हाण,जनता दल( सेक्युलर) पुणे जिल्हा अध्यक्ष संजय बारवकर,प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, आप चे शहराध्यक्ष अनिल डांगे, डॉ.वैशाली साखरे, शारदा भुजबळ, तारा आक्का पठारे, ॲड.स्वप्निल माळवे, ॲड. आदित्य मैड, संदीप कडेकर, रवि लेंडे, अविनाश घोगरे, रवि गुळादे, बंडू दुधाने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *