शिक्रापूर बंजरगवाडी येथे लक्झरी बस व कारचा भिषण अपघात

252

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पुणे नगर राज्यमार्गावर शिक्रापूर बंजरगवाडी येथे लक्झरी बस व कारचा भिषण अपघातात होऊन कार मधील एक जण जागीच ठार तर बसमधील २५ जण जखमी झाले होते. सदर घटना अंदाजे राञी साडे अकराच्या सुमारास घडली. यामध्ये कार चालक विशाल बबन सासवडे (वय ३४ )  हा जागीच ठार झाला असून सदरची घटना सी सी टि मध्ये कैद झाली. यातील व्हिडीओ उपलब्ध झाला आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्पल रंगाची लक्झरी बस (एम एच १४ एच यु २२६५ ) पुण्याहुन नगरच्या दिशेने जात असताना नगरच्या बाजुने कार (एम एच १२  पी एन ६८२८)  ही कार अचानक विरुध्द बाजुने येणाऱ्यालक्झरी बसला धडकली व वेगाने आलेली लक्झरी बस  हाटेल राँयल पँलेस समोर असलेल्या विद्युत खांबाला धडकुन थेट हाटेलमध्ये घुसली. यामध्ये बसमधील २५ प्रवासी जखमी झाले व पाच  गाड्यांचे मोठे नुकसान झाले. घटनेबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक राकेश दिलीप मळेकर (वय ३४) यांनी पोलिस फिर्याद दिली. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *