कवठे येमाईत शिवस्वराज्य दिन उत्साहात संपन्न

535
 शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई ग्रामपंचायतीच्या वतीने आज सोमवार दि. ०६ ला शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. येथील ग्रामपंचायतीसमोर सकाळी नऊ वाजता गुढीची विवधिवात पूजा करून गुढी उभारण्यात आली. गुढी समोरील प्रांगणात यावेळी आकर्षक अशी रांगोळी साकारण्यात आली होती. तर आजच्या या सुवर्णदिनी  ग्रामस्थांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
       यावेळी ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ,सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,माजी सरपंच दीपक रत्नपारखी,रामदास इचके,विक्रम इचके,निलेश पोकळे,दत्तात्रय  पडवळ,नवनाथ सांडभोर,गणेश रत्नपारखी,मिठूलाल बाफणा,लक्ष्मणराव कुंभार,गणेश दळवी,अजित शिंदे,तुषार शिंदे व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *