Search

जेष्ठ नागरीक व दिव्यांगाना पुढील आर्थिक वर्षापासुन मालमत्ता करात ५०% सवलतीचा मुरबाड नगरपंचायतचा निर्णय ; जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना दिलासा

387

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगरपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरपंचायत कार्यक्षेत्रातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगाना सन 2023-24 या आगामी अर्थिक वर्षापासून मालमत्ता करात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाल्याचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्वसाधारण सभेत ठराव क्र.१९ मंजूर झाला असल्याचे सांगत आठशे ते हजार नागरीकांना याचा लाभ होईल असा अंदाज व्यक्त केला. नगरपंचायतच्या सर्व्हे नुसार किती नागरीकांना याचा लाभ मिळतो हे जाहिर करणार असून, दिव्यांगाना नोंदणीचा दाखला दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेष्ठ नागरिकांना वयाचा पुरावा द्यावा लागणार आहे. नगरपंचायत ने आगामी आर्थिक वर्षापासून जेष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी मालमत्ता करात 50 टक्के सवलत देण्याचा ठराव संमत केल्याने जेष्ठ नागरिक व दिव्यांगानी समाधान व्यक्त केले आहे. मात्र यापूर्वीही मुरबाड नगरपंचायतने जन हिताचे अनेक ठराव घेतले. त्याची अंमलबजावणी अजून ही झालेली नाही. यात मागील काळात मुरबाड शहरातील स्मशान भूमीत लाकडांचा पुरवठा करावा, शहरातील फुटपाथ मोकळे करणे, सम विषम पार्किंग व्यवस्था करणे, फेरीवाल्यांसाठी जागा नियोजित करणे, खाऊ गल्ली साठी जागा नियोजित करणे असे अनेक निर्णय प्रलंबित असताना निदान हया ठरावाची अंमलबजावणी नक्की होणार का ? असा हि विषय चर्चेला येत आहे.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *