सुजाता रणसिंग ठरल्या ‘मिसेस एशिया – अर्थ 2022’ च्या विजेता

271

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : योगेश मिश्रा आणि निमिषा मिश्रा यांच्या वतीने आयोजित ‘मिसेस एशिया अर्थ २०२२ या सौदर्य स्पर्धेत पुण्याच्या खराडी येथील सुजाता दत्तात्रय रणसिंग या विजेत्या ठरल्या आहेत. नुकतीच या स्पर्धेची अंतीम फेरी जयपूर येथील ‘दी पुष्कर रिसॉर्ट’ येथे नुकतीच पार पडली. अंतिम फेरीत एकूण १० स्पर्धक होते. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या टॉप फायनलिस्ट मॉडेल्सने टायटल क्रावऊनसाठी कॅट वॉक केला. या स्पर्धेविषयी बोलताना सुजाता रणसिंग म्हणाल्या, “आतापर्यंत मी तीन टायटल जिंकले आहे. ‘य तीनही स्पर्धांमधील माझा प्रवास हा खूप सुंदर होता. माझं खूप चांगल ग्रूमिंग झालं. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. नवीन लोकं भेटली. वैचारीक आदानप्रदान झाली. एक वेगळाच आत्मविश्वास या प्रवासात मला मिळाला. आमची ट्रस्ट आहे, त्यामार्फत आम्ही ‘New wisdom International school’ नावाने शाळा चालवतो त्यामध्ये गोरगरीब  मुलांना शिक्षण दिले जाते, याशिवाय अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कार्य  करीत असतो. केवळ आवड म्हणून मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. मागील वर्षी मिसेस महाराष्ट्रमध्ये मी भाग घेतला होता. त्यात मला  ‘मिसेस अचीव्हर्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर मी ‘वीआ मिसेस इंडिया २०२१’ ची विजेता आहे. अन् आता ‘मिसेस एशिया – अर्थ २०२२’ हे टायटल मला मिळाले आहे. मॉडलिंग किंवा ग्लॅमरस असे माझे कार्यक्षेत्र नाही. पण संधी मिळाली तर मी नक्कीच यामध्ये करीयर करण्याचा विचार करीन. आगामी काळात ‘मिसेस वर्ल्ड’ स्पर्धेत भाग घेण्याचा मानस आहे. आपल्या ध्येयाकडे सातत्यपूर्ण आत्मविश्वासाने  वाटचाल केली तर यश नक्की मिळते.”




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *